" Career Guidance and Future Scope in Higher Education"

जिद्द,चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून स्वतःवरील आत्मविश्वास न ढळू देता कष्ट आणि सातत्य यांचा जोरावर आपल्या अंगभूत कौशल्याचा विकास करून, परिस्थिती रुपी ढगांचावर गरुडझेप घेण्याची इच्छा असेल तर संगणक क्षेत्रात भरपूर संधी आहेत.त्याचा वापर करून नाव कमवा असे प्रतिपादन DYP-ATU चे Dean Admissions and  asst. prof.   डॉ.शंकर पुजारी यांनी केले.ते दूधसाखर महाविद्यालयात संगणक विभागामार्फत आज 1 मार्च 2025 रोजी आयोजित         " Career Guidance and Future Scope in Higher Education" या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.  डॉ. शंकर पुजारी यांनी ME Computer network आणि Ph.D. पदवी संपादन केली आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख संगणक विभागप्रमुख प्रा. सुनिल मिठारी यांनी केले . स्वागत प्रा. अमित पाटील तर आभार प्रा.सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक शास्त्राची विद्यार्थिनी कु. जान्हवी चव्हाण ने केले. यावेळी संगणक शास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

.


                                





दूधसाखर महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र विषयातील विविध संधी या विषयावर बोलताना प्रा.शंकर पुजारी ,शेजारी प्राचार्य डॉ.संजय पाटील, प्रा.सुनील मिठारी, प्रा.सचिन पाटील, प्रा अमित पाटील हजर होते.