दूधसाखर महाविद्यालयात ‘What is Artificial Intelligence’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा


 दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दूधसाखर महाविद्यालयात “What is Artificial Intelligence” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन, पुणे येथील श्री. केतन साठे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.


मुख्य वक्ते श्री. साठे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयातील मूलभूत ते प्रगत अशा विविध अंगांचा प्रभावी, समजण्यास सोपा आणि प्रेरणादायी आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनेक उदाहरणांच्या आधारे त्यांनी विषय अधिक स्पष्ट करून सांगितला. तसेच IBM Skill Build या पोर्टलची सविस्तर माहिती देत त्या पोर्टलवरील विविध मोफत उपलब्ध कोर्सेस बद्दलही मार्गदर्शन केले.


या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये AI क्षेत्राबद्दल नवी उत्सुकता आणि जिज्ञासा निर्माण झाली असून भावी करिअरच्या दृष्टीने त्यांना दिशा मिळाल्याचे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. एस. जी. खाणापुरे व महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. अतुल नगरकर यांचा समावेश होता.


या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सोनाली धवण मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. सचिन पाटील यांनी केले, प्रास्ताविक संगणक विभाग प्रमुख प्रा. श्री. सुनील मिठारी यांनी सादर केले, तर शेवटी प्रा. श्री. अमित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास प्रशासकीय कर्मचारी श्री. सिद्धार्थ पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.